

‘फाळके या नावातच एक स्पार्क आहे. अतिशय सुंदर चित्रपट अजिंक्य फाळके यांनी केला असल्याचे आमीर खान यांनी यावेळी सांगितले’. चित्रपटाची निर्मीती आणि अजिंक्य फाळके यांच्या दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती आमिर खान यांनी यावेळी दिली. उत्तम कथा असल्यास एखादा मराठी चित्रपट करायला नक्कीच आवडेल असं आमिर खानने याप्रसंगी आवर्जून सांगितलं. ‘आमिर खान सरांचं मार्गदर्शन या चित्रपटासाठी लाभलं ते आमच्यासाठी मोलाचं होतं. त्यांची ही कौतुकाची थाप आमचा हुरूप वाढवणारी असल्याचं दिग्दर्शक अजिंक्य फाळके याने यावेळी सांगितलं’.

'इलू इलू’ या चित्रपटाबाबत तरुण वर्गामध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि संगीताने याआधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटात बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम सोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर,वनिता खरात, मीरा जगन्नाथ, आनंद कारेकर, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, निशांत भावसार, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार आहेत.

'सैराट' फेम तानाजीचा नवा लूक तुम्ही पाहिलात का?
मुंबई : सैराट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यातील प्रत्येक पात्र आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. आर्ची, परश्या, सलिम, प्रदिप ही सगळी ...
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.