Thursday, May 15, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

'सोनवडे आणि आंजीवडे घाटमार्गांचे काम लवकर सुरू करा'

'सोनवडे आणि आंजीवडे घाटमार्गांचे काम लवकर सुरू करा'
कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबतच प्रस्तावित आंजीवडे घाटमार्गाचा डीपीआर बनविण्याची कार्यवाही करण्याबाबतही चर्चा झाली. आमदार निलेश राणे यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली.



पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.
Comments
Add Comment