Thursday, May 22, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर, ५ फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी काढणार

पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर, ५ फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी काढणार
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या (Maharashtra Housing Development Corporation Limited / MHADA) पुणे विभागातर्फे पुणे जिल्हा परिषद सभागृहात तीन हजार ६६२ सदनिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत अर्थात लॉटरी काढण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए आणि सोलापूर जिल्ह्यातील सदनिकांसाठी ही सोडत काढण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आला. पुणे म्हाडाच्या तीन हजार ६६२ सदनिकांसाठी ७१ हजार ६४२ अर्ज आले आहेत. निकालाचे थेट प्रक्षेपण housing.mhada.gov.in आणि अधिकृत यू ट्युब चॅनलवर करण्यात आले.







अधिकृत विजेत्यांची यादी बुधवार २९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी सहा वाजता housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. या संदर्भात विजेत्या अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे.



पुणे म्हाडाची ऑनलाईन पद्धतीने सोडत अर्थात लॉटरी काढली. आता बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी कोकण म्हाडाची ऑनलाईन पद्धतीने सोडत अर्थात लॉटरी काढण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत अर्थात लॉटरी काढली जात आहे. घर वाटपाची प्रक्रिया पारदर्शक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला म्हाडाच्या योजनांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन करत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.ज्या विकासकांनी त्यांच्या अडचणींमुळे प्रकल्प सोडून दिले आहेत त्या विकासकांकडून प्रकल्प परत घेऊन ते नियमानुसार मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. रखडलेले सर्व प्रकल्प टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील, असे एकनाथ शिंदे म्हणाले. म्हाडाची घरे आणि पंतप्रधान आवास योजनेची घरे पात्र लाभार्थ्यांना मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार परस्पर समन्वय राखून काम करत आहे; असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
Comments
Add Comment