सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.


सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबात मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष द्यावे. ही सर्व पदे येत्या ८ महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी, विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, करावयाच्या सुधारणा, पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.



यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची १३ एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची ३ एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील १० एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या ८ महिन्यात भरली जातील, अशी माहिती आयुक्त निवतकर यांनी दिली.

Comments
Add Comment

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.