Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Buldhana : अबब! गर्भवतीच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ

Buldhana : अबब! गर्भवतीच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात दुर्मिळ घटना घडल्याचे समोर आले आहे. एका गर्भवती महिलेच्या गर्भातल्या बाळाच्या पोटात बाळ असल्याचे समोर आले आहे. गर्भवती महिला नियमित तपासणीदरम्यान हा धक्कादायक प्रकार आढळून आला.



मिळालेल्या माहितीनुसार, एका ३२ आठवड्याची गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी दवाखान्यात गेली. यावेळी डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचे दिसून आले. दरम्यान, या शस्त्रक्रियेसाठी गर्भवती महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या प्रकाराला वैद्यकीय भाषेत 'फिटस इन फिटो' (Fetus in fetu) असे म्हटले जाते. कॉनजेनाईटल एबनॉर्मेलिटीमुळे अशी स्थिती निर्माण होते. यात बाळाच्या पोटातही बाळासारखा गोळा दिसतो. पाच लाख गरोदर महिलांमध्ये एका महिलेमध्ये असं दिसून येतं. प्रसूती झाल्यानंतर बाळाला त्या पोटातील बाळाचा त्रास होतो तेव्हा शस्त्रक्रिया केली जाते.

Comments
Add Comment