Ratnagiri : “नवनिर्माण”च्या ऑटो एक्स्पोला भरघोस प्रतिसाद!

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) विभागाने आज राज्यस्तरीय क्विझ आयटी टेक फेस्ट आणि ऑटो एक्स्पोचे आयोजन केले होते. या फेस्टला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे या फेस्टचे पंधरावे वर्ष आहे.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑटोमोबाइल क्षेत्रात ४० वर्ष कार्यरत असलेले रत्नागिरीतील नाईक मोटर्सचे नजीर नाईक उपस्थित होते. या अनोख्या ऑटो एक्स्पोचे त्यांनी कौतुक केले. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलांचा मागोवा घेतानाच गाड्यांमध्ये आलेल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. तसेच नवीन तंत्रज्ञान अवगत करणे का गरजेचे आहे, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


यावेळी व्यासपीठावर नजीर नाईक यांच्यासह नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, उपाध्यक्ष डॉ. अलिमिया परकार, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, सीएस-आयटी विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतीक्षा सुपल उपस्थित होत्या.



श्री. हेगशेट्ये यांनी ऑटो एक्स्पो आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करतानाच वेगळा विचार करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते, फक्त त्याला चालना देण्याची गरज असते, असे नमूद केले. आजपर्यंत अशा एक्स्पोच्या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थी बाहेर पडले आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले.


श्री. नाईक यांच्या हस्ते ऑटो एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. एक्स्पोमध्ये २०० सीसी ते १४०० सीसी क्षमता असलेल्या ३ लाखांपासून ते २२ लाखांपर्यंतच्या सुमारे ७० दुचाकी, तसेच चारचाकींमध्ये विंटेज ते सुपर मॉडेल्स अशा सुमारे १५ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरीबरोबरच चिपळूण, राजापूर, संगमेश्वर येथून या गाड्या आल्या होत्या. डुकाटी कंपनीच्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या दोन मॉडेल्सपैकी एक मॉडेल या एक्स्पोमध्ये सहभागी झाले होते. एक्स्पो पाहण्यासाठी रत्नागिरी शहरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.

Comments
Add Comment

Nashik : रिंग रोडच्या मुद्द्यावर, निश्चितपणे मार्ग काढणार - मंत्री गिरीश महाजन

नाशिक : रिंग रोडच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, “या प्रकरणात १५ ते २० टक्के

Nashik News : 'आपला कुंभ, आपली जबाबदारी' पुस्तिकेचे प्रकाशन

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा नाशिककरांसह सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी

India vs England : टीम इंडियासमोर इंग्लंडचे ३८८ धावांचे कठीण आव्हान

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना लॉर्ड्सवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणफेक

Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री तरुणावर गोळीबार; पुढे जे घडलं ते एखाद्या सिनेमासारखंच…

पुणे : पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या वादातून 23 वर्षीय तरुणावर

Skirt Fashion: स्टायलिश दिसायचंय? मग हे ट्रेंडी स्कर्ट नक्की ट्राय करा