Tuesday, May 13, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mahakumbh Stampede: महाकुंभमधील चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी

Mahakumbh Stampede: महाकुंभमधील चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी

प्रयागराज: प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत(Mahakumbh Stampede) ३० भक्तांचा मृत्यू झाला आहे तर ६० जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्ताने अमृतस्नानासाठी महाकुंभ येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. महाकुंभ मेळ्याचे अधिकारी आणि कुंभ डीआयडी वैभव कृष्ण यांनी बुधवारी चेंगराचेंगरीबाबत पत्रकार परिषद घेतली.


 


अधिकाऱ्यांनी सांगितले की महाकुंभ चेंगराचेंगरीत ३० भक्तांचा मृत्यू झाला तर ६० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना शहराच्या विविध भागांतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्यांपैकी २५ जणांची ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. पाच जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. यासाठी १९२० हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.



काय आहे अपघाताचे कारण?


डिआयजी यांनी चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे कारण सांगितले आहे. त्यांच्या माहितीनुसार, मौनी अमावस्येच्या ब्रम्ह मुहूर्तावेळेस लोकांची मोठी गर्दी झाली होती. मेला परिसरात गर्दीच्या दबावामुळे अखाडा मार्गावरील अनेक बॅरिकेड्स तुटले. दुसरीकडे स्नासाठी लोक बसलेले होते. यांना गर्दीने चिरडण्यास सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि अॅम्ब्युलन्सच्या मदतीने ९० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने त्यापैकी ३० भक्तांचा मृत्यू झाला. तर काही जखमींना घरी पाठवण्यात आले. अद्याप ३६ जण रुग्णालयात दाखल आहेत.

Comments
Add Comment