Thursday, October 23, 2025
Happy Diwali

महाकुंभ चेंगराचेंगरी: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी केली बातचीत, दिले तत्काळ मदतीचे आदेश

महाकुंभ चेंगराचेंगरी: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगींशी केली बातचीत, दिले तत्काळ मदतीचे आदेश

प्रयागराज : प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नजर ठेवून आहेत. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झालेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी एका तासाच्या आत दोनवेळा उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बातचीत केली.

या संबंधी पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तत्काळ मदतीचे आदेश दिले आहेत. ते सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी बातचीत करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

 

भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व आरोग्य सेवांच्या मदतीचे आश्वासन दिले. योगी आदित्यनाथ यांनी नड्डा यांना सांगितले की परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Comments
Add Comment