Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीISRO 100th Mission : ‘इस्रो’ने रचला इतिहास; १०० वे मिशन यशस्वी!

ISRO 100th Mission : ‘इस्रो’ने रचला इतिहास; १०० वे मिशन यशस्वी!

जीएसएलव्ही रॉकेटसह एनव्हीएस-02 उपग्रह यशस्वीरित्या लॉन्च

नवी दिल्ली : इस्रोने ऐतिहासिक १०० वे मिशन यशस्वी केले. या मोहिमेत इस्रोने जीएसएलव्ही रॉकेटमधून नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला. इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आणि या वर्षातील हे पहिलेच मिशन होते. (ISRO 100th Mission)

Buldhana : अबब! गर्भवतीच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ

इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून जीएसएलव्ही रॉकेटद्वारे नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-२ प्रक्षेपित केला. हे प्रक्षेपण बुधवारी सकाळी ६.२३ वाजता करण्यात आले. २० मिनिटांत उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेज असलेले जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल त्याच्या १७ व्या उड्डाणात नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-२ वाहून नेला. नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-२ हा नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन मालिकेतील दुसरा उपग्रह आहे. भारतीय उपखंडातील तसेच भारतीय भूमीपासून सुमारे १,५०० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रांमधील वापरकर्त्यांना अचूक स्थान, वेग आणि वेळेची माहिती प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.

१०० व्या मिशनच्या यशाबद्दल इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त करताना म्हणाले की, २०२५ मध्ये इस्रोचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एनव्हीएस-२ उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. या मोहिमेचे १०० वे प्रक्षेपण हा एक मैलाचा दगड आहे.

नारायणन यांनी शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखालील अंतराळ मोहिमेची आठवण केली. ते म्हणाले की, इस्रोने आतापर्यंत सहा पिढ्या प्रक्षेपण रॉकेट विकसित केली आहेत. याची पहिली पिढी सतीश धवन यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे त्याचे प्रकल्प संचालक होते. तेव्हापासून या १०० प्रक्षेपणांमध्ये इस्रोने ५४८ उपग्रह कक्षेत ठेवले आहेत. ज्यात परदेशी उपग्रहांचाही समावेश आहे. (ISRO 100th Mission)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -