
मुंबई: जर तुम्ही घाईघाईत जेवत असाल तर हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अनेकजण केवळ १० मिनिटाच्या आत आपले जेवण संपवतात. जर तुम्हाला याबाबतची माहिती नसेल तर याबाबत विस्ताराने जाणून घ्या.
सकाळी लोकांना लवकर ऑफिसला पोहोचायचे असते दुपारी ऑफिसमध्येच पटापट लंच आणि रात्रीपर्यंत शरीर इतके थकून जाते की असे वाटते की लवकर लवकर जेवून झोपावे. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याच वेळेला शांततेने जेवता येत नाही.
अनेक रिसर्चमध्ये हे ही समोर आले आहे की लवकर लवकर खाणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. तसेच
मोठमोठे घास खाल्ल्याने पोटात हवाही जाते. यामुळे गॅस आणि ब्लॉटिंगची समस्या सुरू होते.

मुंबई : आपण दीर्घकाळपर्यंत आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये पोषणाच्या भूमिकेकडे (Health Tips) दुर्लक्ष करू शकत नाही. आपल्या जीवनशैली निवडींचा आरोग्यावर ...
विज्ञानानुसार आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा जेवणाच्या २० मिनिटांच्या आत पोट ते भरले असल्याचा सिग्नल देते. जर तुम्ही लवकर लवकर जेवत असाल तर २० मिनिटांच्या आत तुमचे पोट भरल्याचा सिग्नल देतो. याचा परिणाम लठ्ठपणा, ओबेसिटी, वेगाने वजन वाढणे
वेगाने जेवण जेवल्याने शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंसचा धोका वेगाने वाढतो. या कारणामुळे हाय बीपी वाढण्यासोबतच इन्सुलिनचा स्तरही गडबडतो.
वेगाने जेवण जेवल्याने टाईप २ डायबिटीजचा धोकाही वाढतो. तुम्ही डायबिटीजचे रूग्णही बनू शकता. ब्लडमध्ये शुगर वाढणे आणि इन्सुलिन बिघडणे टाईप २ डायबिटीजचे कारण ठरू शकते.