मुंबई: व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे मुलांची वाढ रोखली जाऊ शकते. व्हिटामिन डी कॅल्शियमने परिपूर्ण असते जे हाडांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये त्रास आणि आणखी आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की मुलांचा योग्य विकास व्हावा तर यासाठी व्हिटामिन डीची कमतरता जाणवू देऊ नका.
व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे रोखली जाते मुलांची उंची
मुलांमध्ये व्हिटामिन डीची कमतरता असेल तर त्यांची उंची वाढत नाही. व्हिटामिन डीमुळे शरीरात कॅल्शियमचे अवशोषण होते. जर व्हिटामिन डी पुरेसे मिळाले नाही तर कॅल्शियम शरीरारत शोषले जाणार नाही आणि हाडांचा विकास होणार नाही. आपल्या शरीराला अधिकांश व्हिटामिन डी हे सूर्यप्रकाशाच्या किरणांनी मिळते. व्हिटामिन डी हे मुलांची उंची आणि हाडांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
व्हिटामिन डीची कमतरता असल्यास आढळतात ही लक्षणे
कपाळावर घाम येणे
हाडे दुखणे
मसल्स दुखणे
थकवा
मूड खराब असणे
झोप न येणे
केस गळती
या पदार्थांतून मिळते व्हिटामिन डी
मासे, अंडी, चीज, मशरूम, संत्री तसेच टोफू
गायीचे दूध, अक्रोड, सोया दूध, बदाम दूध
नट्स, बिया, अख्खे धान्य, डार्क चॉकलेट यातूनही व्हिटामिन डी मिळते.
अंड्याचा पिवळा बलक खा.
व्हेज असणारे लोक मशरूम खाऊ शकतात.
संत्रे अथवा याचा ज्यूस पिऊ शकता.