Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडी'फसक्लास दाभाडे' कुटुंबाची युएई, गल्फमध्येही चर्चा

‘फसक्लास दाभाडे’ कुटुंबाची युएई, गल्फमध्येही चर्चा

मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला असून हे दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचे केवळ महाराष्ट्रातच नाही तर युएई, गल्फ कंट्रीजमध्येही ग्रँड ओपनिंग झाले आहे.

परदेशातही या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून पहिल्याच विकेंडला ‘फसक्लास दाभाडे’ने महाराष्ट्रासह परदेशातही ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड मिरवत करोडोंचा पल्ला गाठला आहे. दाभाडे कुटुंबातील लग्नकार्य, नात्यात आलेला दुरावा, गैरसमज, सामाजिक विचारसरणी, रूढी परंपरा अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे.

खदखदून हसवतानाच डोळ्यांची किनार पाणवणारा हा चित्रपट म्हणजे प्रत्येकासाठी मनोरंजनाची मेजवानी ठरत आहे. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते असणाऱ्या या चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -