Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीBike Taxi : मुंबईत लवकरच सुरु होणार बाईक टॅक्सी! महिला प्रवाशांची घेणार...

Bike Taxi : मुंबईत लवकरच सुरु होणार बाईक टॅक्सी! महिला प्रवाशांची घेणार विशेष काळजी

एका किलोमीटरसाठी किती असेल भाडे?

मुंबई : मुंबईकरांचा प्रवासही जलद आणि स्वस्तात होण्यासाठी परिवहन विभागाने ओला, उबेरनंतर आता बाईक टॅक्सी सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्यावर हा उत्तम पर्याय मुंबईकरांसाठी उपलब्ध झाला आहे.

Nashik News : नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवारी बंद!

परिवहन विभागाने वाहतुकीच्या सेवा सुविधा वाढवण्यासाठी हा बाईक टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन महिन्यांत ही सुविधा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. तर मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकते, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

महिला सुरक्षेची विशेष काळजी

बाईक टॅक्सी सुरु करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवतांना बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असेल अशी अट ठेवली जाणार आहे.

दरम्यान, एका किलोमीटरसाठी ३ रूपये बाईक टॅक्सीचं भाडं असणार आहे. तसेच बाईक टॅक्सीत GPS आवश्यक असून पाठी बसणा-याला हेल्मेट बंधनकारक असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -