
सोलापूर : जीबीएस (गुलियन बॅरे सिंड्रोम)चे जिल्ह्यात संशयित पाच रूग्ण असून त्यातील एक रूग्ण बरा झाला आहे. सध्या उपचार घेत असलेले चारही जीबीएस संशयित रूग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत. औषधे व यंत्रांसाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

तीन परदेशी नागरिक ताब्यात मुंबई : डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी भारतात ड्रग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न ...
जीबीएस आजाराबाबत लोकांत गैरसमज व संभ्रम आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. तो होऊ नये, यासाठी नागरिकांनी स्वच्छ, शुद्ध पाणी व पूर्णपणे शिजवलेल्या आहाराचे सेवन करावे. रुग्णांवरील उपचारासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून दोन कोटींचा निधी दिला आहे. पुरेसा निधी उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध करण्यात येईल. सर्वजण मिळून याविरोधात लढूया, जिंकूया, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले उपस्थित होते.