Thursday, May 8, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Cocaine Seized By DRI Mumbai : मुंबईत २२ कोटी रुपयांचे २.२ किलो कोकेन जप्त

Cocaine Seized By DRI Mumbai : मुंबईत २२ कोटी रुपयांचे २.२ किलो कोकेन जप्त

तीन परदेशी नागरिक ताब्यात


मुंबई : डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी भारतात ड्रग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन युगांडाच्या नागरिकांना रोखले. तिघे संशयित युगांडा मधील एंटेब्बे इथून आलेल्या विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. चौकशी केल्यानंतर, तिघांनीही तस्करीच्या उद्देशाने ड्रग्ज असलेले कॅप्सूल घेतल्याचे कबूल केले. संशयितांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, वैद्यकीय निरीक्षणासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


/>

यावेळी संशयितांनी एकूण १७० कॅप्सूल पोटात घेतल्याचे समजले. यामध्ये एकूण २१९७ ग्रॅम कोकेन होते. या कोकेनचे मूल्य अंदाजे २१.९७ कोटी रुपये आहे. या प्रवाशांकडून अंमली पदार्थ नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार कोकेन जप्त करण्यात आले. या तिघांना अटक करण्यात आली आणि एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment