Saturday, February 15, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यवैद्य साने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेड अर्थात ‘माधवबाग’ - संस्थापक, अध्यक्ष  डॉ.रोहित साने

वैद्य साने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेड अर्थात ‘माधवबाग’ – संस्थापक, अध्यक्ष  डॉ.रोहित साने

उद्योगांमध्ये काहीजण नाईलाजाने पडतात, काहीजण  विचारपूर्वक उतरतात तर काहीजण योगायोगानं शिरतात. माधवबागचे संस्थापक डॉक्टर रोहित साने हे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे उद्योगात शिरले.

शिबानी जोशी

क्टर रोहित साने स्वतः एमबीबीएस डॉक्टर. त्यांचे वडील माधव साने हेही डॉक्टर होते. रोहित साने यांच्या वडिलांना हार्ट अ‍ॅटॅक आला आणि ते १७ दिवस रुग्णालयात होते. त्या १७ दिवसांत वडिलांची परिस्थिती रोहित यांनी जवळून पाहिली. ऍलोपॅथी ट्रीटमेंट सुरू होती. स्वतः डॉक्टर असूनही आपण वडिलांना वाचवू शकलो नाही हे शल्य त्यांच्या मनात होते आणि त्याच दिवशी त्याचवेळी त्यांनी इतरांच्या वडिलांना वाचविण्याचा जणू विडा उचलला. आयुर्वेदाचा त्यांचा अभ्यास होताच आणि आयुर्वेदातील अनेक वैशिष्ट्य त्यांच्या लक्षात आल्या होत्या. ऍलोपॅथीमधल्या महागड्या तरीही अनेक मर्यादा असलेल्या ट्रीटमेंट ऐवजी आपल्या देशाच्या संस्कृतीतली साधी सोपी, कुठचेही साईड इफेक्ट नसलेली आयुर्वेद चिकित्सा आपण दिली, तर अनेकांच्य जीवनपद्धतीत बदल घडवून त्यांना वाचवू शकू असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्यातूनच माधवबागची स्थापना झाली.

सध्या भेडसावणारे मोठे आजार म्हणजे बीपी, हृदयरोग, लठ्ठपणा आणि डायबिटीस. हे सर्व रोग एकमेकांत गुंतलेले आहेत आणि एकदा का यातील एखादा विकार झाला, तर शुक्लकाष्ट मागे लागत त्यामुळे हे रोग होऊच नयेत आणि झाले, तर आयुर्वेदातील प्रभावी उपचारांनी ते नियंत्रित करावे असे त्यांनी ठरवले आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. एका दवाखान्याने २००६ साली सुरुवात झाली. रोहित साने हे डॉक्टर होतेच, ते संशोधक, उद्योजकही झाले. आरोग्य क्षेत्र ही आता हेल्थ इंडस्ट्री झाली आहे. नुसता आयुर्वेदिक क्षेत्राचा विचार केला, तर जवळपास ३५००  कोटी रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते आणि त्या व्यतिरिक्त ऍलोपॅथी आणि इतर वैद्यकीय सुविधा असे हे क्षेत्र आज खूप विस्तारलं आहे.  डॉ. रोहित यांनी आधुनिक वैद्यकशास्त्रातील आपल्या शिक्षणाचा उपयोग केला, सूक्ष्म संशोधन केले. व्यापक प्रयोग आणि त्याचा सखोल अभ्यास केला. या प्रयत्नांमुळे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदात सांगितलेल्या सुस्थापित उपचारपद्धतींचा मिलाफ झाला, आणि हृदयविकारावर आयुर्वेदामार्फत उपचार द्यायला सुरुवात झाली. डॉ. साने यांच्या योगदानाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असून त्यांना प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  पहिले आयुर्वेद कार्डियाक रिहॅब सेंटरची स्थापना डॉ. रोहित यांनी २००६ मध्ये खोपोली येथे केली. खोपोली येथे विस्तीर्ण परिसरावर नैसर्गिक वातावरणात पंचकर्म, सुनियोजित आहार, योगासन अशा माध्यमातून निवासी उपचार दिले जातात. डॉक्टर रोहित साने यांच म्हणणं आहे की ‘इथे आम्ही कमकुवत हृदय दुरुस्त करत नाही, आम्ही ते मजबूत करतो.’ फक्त रोगच नाही तर  आरोग्याचीही काळजी घेतो. संपूर्ण हृदयाच्या काळजीसाठी एपेक्स बीटचा दृष्टिकोन इथे राबवला जातो. हृदयविकारांवर उपचार करण्यासाठी माधवबागने स्वतःला एक विश्वासार्ह पर्याय म्हणून यशस्वीरित्या स्थापित केले आहे. आधुनिक वैद्यक, आयुर्वेद, आहार आणि फिजिओथेरपी डॉक्टरांची टीम  इथे कार्यरत असते. हृदय नाही तर सर्व शरीरावर इथे उपचार केले जातात.

आधुनिक जीवनशैली, जागरण, ताण-तणाव यामुळे समाजात मधुमेह, हृदयरोग, रक्तदाबाचे, थायरॉईडचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे फक्त मुंबईतच नाही, तर सर्वत्र आयुर्वेदिक उपचार द्यावे यासाठी फ्रेंचाईजी या प्रकाराची साने यांनी सुरुवात केली. सुरुवातीला केवळ हृदयरोगावर उपचार सुरू होते; परंतु हृदयरोग रुग्णांइतकेच प्रमाण मधुमेह, अतिरक्तदाब तसेच लठ्ठपणा असलेल्या रुग्णांचे आहे व हे  सर्व हृदयरोगास कारणीभूत ठरणारे आजार असल्याने माधवबागने त्या आजारांवरही संशोधनातून विशेष उपचार सुरू केले. हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया उपचार करणारी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा तयार केली. या चिकित्सेच्या मदतीने लवकर बरे न होणारे हृदयरोग, बीपी, अती लठ्ठपणा आणि टाईप २ डायबेटीससारखे जुनाट आजार  रिव्हर्स होऊ शकतात हे सिद्ध करून दाखवले.  आतापर्यंत डिसिज रिव्हर्सल चिकित्सेन १० लाखांहून अधिक हृदयविकार रुग्णांवर  उपचार करण्यात आले आहेत. त्याला लॅसेट, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, ब्रिटिश मेडिकल जर्नल सारख्या १५० हुन अधिक जगप्रख्यात रिसर्च पेपर्सनी देखील मान्यता दिली आहे. यात दर्जेदार औषधं, अॅडव्हान्स तपासण्या, योग, व्यायाम, ध्यानधारणा, आहार अशा अनेक आवश्यक गोष्टींची सांगड घातली गेली आहे. अर्थात या सर्वांना रुग्णांचा प्रतिसाद ही गरजेचा असतो. आयुर्वेदिक उपचाराबरोबर, जीवनशैलीतील बदल आणि आधुनिक वैद्यकातील तपासण्या यांची सांगड घालून हृदरोगासारख्या प्राणघातक आजारांशी मुकाबला करण्यासाठी ते  पॉझिटिव लागतात. रुग्णांनी व्यायाम, योगा देखील करणं गरजेचे असते.

रुग्णांना आयुर्वेदिक गोळ्या, औषध, सात्विक आहार देता यावा यासाठी माधवबागचा स्वतःचा निर्मिती कारखाना आहे . रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार त्यामुळे औषधोपचार देण सुलभ झाल आहे. खोपोली इथल्या निवासी संकुलामध्ये १० एकर जमिनीवर झाडा वृक्षांच्या सहवासात छानशी घरकुल उभारून रुग्णांना नैसर्गिक वातावरणात निवासी उपचार दिले जातात. पहाटेपासून होम हवन, योगासन, काढे, पौष्टिक आहार, पंचकर्म असा दिनक्रम इथे चालतो. रुग्णांना २४ तास डॉक्टर उपलब्ध असू शकत नाही त्यासाठी घरच्याघरी देखभाल घेता येईल या उद्देशाने माधवबाग नी ibPulse नावाचे अॅप तयार केले आहे. ज्यामध्ये ४५० हून अधिक डॉक्टरांचे ऑनलाईन मार्गदर्शन, आहार व व्यायामाचे मोफत वेळापत्रक, पाककृती, घरगुती औषधोपचार आणि आयुर्वेदिक सिद्धांताविषयी लाईव्ह व्हीडिओज आणि चॅट आधारित आरोग्य देखभाल सांगितली जाते. माधवबागतर्फे आरोग्यविषयक मासिकही प्रकाशित केलं जात. महाराष्ट्र,गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल, हरियाणा, ओडिशा, जम्मू और कश्मीर असा १३  राज्यांमध्ये पसरलेली ३६० हून अधिक क्लिनिक्स, तसेच खोपोली, कोंढाळी व विशाखापट्टणम येथे ३ हॉस्पिटल्स आज माधवबाग चालवते. अंदाजे एक हजार जण माधवबागमध्ये कार्यरत आहेत. माधवबागचा व्याप इतका वाढल्यानंतर  माधवबागला ऑफिशियल लिस्टेड कंपनी करण्याचं रोहित साने यांनी ठरवलं आणि २०२२ साली आयपीओ येऊन कंपनी शेअर बाजारात  लिस्टेड झाली आहे. संशोधन आणि नाविन्याचा ध्यास घेऊन  रुग्णस्वास्थ्यातील सुधारणेसाठी आवश्यक असेल ते सर्व करणारी एखादी आरोग्य व्यवस्था अशा तऱ्हेने लिस्टेड कंपनी झाल्याच क्वचितच पाहायला मिळत असेल, ते माधवबागनी करून दाखवलय.
joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -