जळगाव : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुरु होणार आहेत. या परिक्षेच्या कालावधीत परीक्षेचा व अभ्यासाचा ताण आणि परीक्षेची भिती यामुळे विद्यार्थी दडपणाखाली येवून नकारात्मक विचार करतात व कधी-कधी टोकाची भुमिका घेतात.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व त्यांनी निकोप वातावरणात परीक्षा द्यावी म्हणून विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येत असते. विद्यार्थ्यांच्या ताण-तणाव विषयक समस्यांचे शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी व ताण-तणावामुळे विद्यार्थ्यांनी टोकाची भुमिका घेवू नये यासाठी समुपदेशनासाठी व अनिष्ट घटना टाळण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर खालील समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Donald Trump : अमेरिकेचे नुकसान करणाऱ्या देशावर सरकार शुल्क लागू करणार – डोनाल्ड ट्रम्प
ज्या विद्यार्थी / पालकांना काही ताण-तणाव / समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांकडे ताण-तणाव/समस्या मांडल्यास त्यांना समुपदेशकांमार्फत योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.