मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे.अशातच भारतीय संघात टेन्शनचं वातावरण आहे. टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेत खेळेल की नाही याची अद्याप खात्री नाहीये. त्याची निवड झाली पण तो अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही.त्यामुळे बुमराहचा बॅकअप खेळाडू म्हणून मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान बुमराह जखमी झाला होता. त्यानंतर त्याने सामना सुरु असतानाचा मैदान सोडले. त्यावेळी तो दुसऱ्या डावात गोलंदाजीही करू शकला नाही. त्यातुन तो अद्याप फिट होऊ शकला नाही आणि लवकरच न्यूझीलंडमधील डॉक्टरांशी संपर्क साधणार असल्याची माहिती मिळत आहे. न्यूझीलंडच्या वैद्यकीय अहवालात जर जसप्रीत बुमराहला आरामाचा सल्ला दिला गेला. तर त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात मोहम्मद सिराजची निवड होण्याची शक्यता आहे. बुमराहचा बॅकअप खेळाडू म्हणून सिराजला संधी मिळेल असं सांगण्यात येत आहे.
Indian Fisherman : श्रीलंकेच्या गोळीबारात २ भारतीय मासेमार जखमी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशसोबत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेपूर्वी बुमराह फिट होणार नसल्याचं अहवाल दिला गेला तर मात्र त्याला संघातून वगळलं जाईल. त्याच्याऐवजी संघात अनुभवी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.