Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेDombivli News : डोंबिवलीत हळदी कुंकूच्या कार्यक्रमावरून मराठी विरुद्ध अमराठी भाषिक वाद...

Dombivli News : डोंबिवलीत हळदी कुंकूच्या कार्यक्रमावरून मराठी विरुद्ध अमराठी भाषिक वाद शिगेला

डोंबिवली : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई , ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई ,पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले.काल पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद शिगेला पोचला. डोंबिवली नांदीवली मधील एका सोसायटीत सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला तसेच अमराठी महिलांनी मराठी महिलांना अपशब्द वापरले असल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री

डोंबिवलीतील पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या मराठी विरुद्ध इमारतीमध्ये अमराठी वाद उफाळून आला आहे. या इमारतीमध्ये येत्या २ फेब्रुवारी रोजी सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे.

याबाबत मराठी कुटुंबाने आरोप केलाय की,” अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला. आम्हाला शिवीगाळ केली व मराठा मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले”. याप्रकरणी या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. अमराठी कुटुंबियांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळतेय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -