
राजकोट: टीम इंडिया आणि इंग्लंडचा संघ यांच्यात राजकोट येथे आज तिसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने २० षटकांत १७१ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान मिळाले आहे. बेन डकेटने २६ बॉलवर अर्धशतक ठोकले.
इंग्लंडने २० षटकांत ९ विकेट गमावताना १७१ धावा केल्या. टीम इंडियासाठी वरूण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. तर इंग्लंडसाठी बेन डकेटने अर्धशतक लगावले. त्याने २८ चेंडूचा सामना करताना ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार लावले. तर दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोनने ४३ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. जोस बटलरने २४ धावा करत योगदान दिले.