पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. अमिताभ गुप्ता यांच्या संपत्तीची गुप्त चौकशी एसीबीकडून पूर्ण झाली आहे.
गुप्त चौकशीनंतर त्यांच्या उघड चौकशीची परवानगी एसीबीच्या महासंचालकांकडे मागण्यात आली आहे. गुप्त चौकशीत तथ्य आढळल्यानंतर उघड चौकशीची परवानगी मागण्यात आली आहे. गुप्ता यांच्या विरोधात माहिती आधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी तक्रार दाखल केली होती.
अमिताभ गुप्ता हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे वरीष्ठ आयपीएस आधिकारी होते. अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्याची एसीबीकडून चौकशी होण्याची पहिलीच वेळ आहे. गुप्ता यांचा पुण्यातील ॲमनोरा टाऊनशिपमधील स्वीट वॅाटर विला प्रकल्पात अालिशान विला. विलाची किंमत २५ कोटी असल्याचा आल्हाट यांचा दावा आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे अमिताभ गुप्ता यांचा अालिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत २२ कोटी रुपये असल्याचे आल्हाट याचे म्हणणे आहे.