Nashik News : गोंदेजवळ झालेल्या अपघातात ३ जण गंभीर जखमी

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर सकाळी एका युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यातच आज सकाळी साडेआठच्या दरम्यान दुसरा अपघात घडला आहे. गोंदे फाट्याजवळ महिंद्रा कंपनी परिसरात मोटारसायकलीला एका बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ह्या घटनेत देवळे, ता. इगतपुरी येथील कैलास एकनाथ दालभगत वय २५, कोमल कैलास दालभगत वय २५, साहिल जयराम तोकडे वय २२ हे तीन जण गंभीर जखमी झाले.



जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन तिन्ही जखमी व्यक्तींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेमुळे जखमी व्यक्तींचे प्राण वाचले आहे.

Comments
Add Comment

सोहा अली खानची दिवाळी साफसफाई जिममध्येच! मजेशीर व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधले

मुंबई : दिवाळी जवळ येताच सगळीकडेच साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री सोहा

फिल्मफेअरच्या स्टेजवरील शाहरूखच्या 'त्या' कृतीची सोशल मीडियात चर्चा

मुंबई : बॉलिवूड का बादशाहा अशी ओळख असलेला शाहरुख खान नेहमीच कोणत्या तरी कारणामुळे लक्ष वेधून घेतो. असाच लक्षवेधी

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.

भारतीय आहाराविषयीच्या संशोधनात उघड झाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : सध्या बहुसंख्य भारतीय जो आहार घेतात त्यात कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त आहे. या आहारात प्रथिने आणि

पुन्हा एकदा आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

नवी दिल्ली :  आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई

हिवाळ्यातील सुपरफूड! तीळ खाल्ल्याने हृदय, हाडे आणि त्वचेला मिळतात फायदे. जाणून घ्या जबरदस्त फायदे

तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड