स्मृती मंधानाने पटकावला आयसीसी क्रिकेटपटू ऑफ द ईयर पुरस्कार

मुंबई : आयसीसीने सोमवारी (२७ जानेवीरी) वनडेतील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. यादरम्यान, भारतासाठीही आनंदाची बातमी मिळाली आहे.यामध्ये महिला संघात टीम इंडियाची स्मृती मानधना हिला पुरस्कार मिळाला आहे.तर पुरुष संघात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीपनेही आयसीसी पुरस्कार २०२४ मध्ये आपला ठसा उमटवला आहे.


भारताची स्टार क्रिकेटपटू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाला आयसीसीचा सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटू २०२४ पुरस्कार मिळाला आहे. स्मृतीसह या पुरस्कारासाठी श्रीलंकेची चमारी अट्टापट्टू, ऑस्ट्रेलियाची ऍनाबेल सदरलँड, दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्डरवार्ट या खेळाडूंनाही नामांकन मिळाले होते. पण त्यांना मागे टाकत मानधनाने हा पुरस्कार पटकावला आहे. मानधना आयसीसीच्या महिला वनडे संघ २०२४ मध्येही स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. तिला आणि भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिचा आयीसीसीच्या सर्वोत्तम महिला वनडे संघ २०२४ मध्ये समावेश आहे.


स्मृतीने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध वनडे क्रिकेट खेळले आहे.तिने २०२४ वर्षात वनडेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत तीन सामन्यात ३४३ धावा केल्या होत्या, तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतक ठोकले. स्मृतीने २०२४ मध्ये १३ वनडे सामने खेळताना ४ शतके आणि ३ अर्धशतकांसह ५७.४६ च्या सरासरीने ७४७ धावा केल्या. तिने या वर्षात महिला वनडेमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.


भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीपनेही आयसीसी पुरस्कार २०२४ मध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याला आयसीसीचा सर्वोत्तम टी२० पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्शदीपने या संपूर्ण वर्षात शानदार खेळ केला होता. त्याने २०२४ वर्षात १८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १३.५ च्या सरासरीने ३६ विकेट्स घेतल्या होत्या.


आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू २०२४ पुरस्कार अफगाणिस्तानच्या अझमतुल्ला ओमरझाई याला मिळाला आहे.त्याने हा पुरस्कार मिळवताना वनिंदू हसरंगा (श्रीलंका), कुशल मेंडिस (श्रीलंका) आणि शेर्फेन रुदरफोर्ड (वेस्ट इंडिज) यांना मागे टाकले. या तिघांनाही या पुरस्कारासाठी मानांकन मिळाले होते.त्याने २०२४ वर्षात ओमरझाईने १४ सामने खेळले. यामध्ये त्याने ४१७ धावा केल्या आणि १४ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या शानदार कामगिरीनंतर त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.

Comments
Add Comment

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल

Arjuna Award : बुद्धिबळात १९ व्या वर्षी विश्वविजेत्या झालेल्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार

वयाच्या १९व्या वर्षी विश्वविजेती, आता अर्जुन पुरस्काराची मानकरी; नागपूरच्या दिव्या देशमुखचा यशस्वी

2032 UCI Road World Championships : पुण्यात होणार युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ स्पर्धा; आयोजनाला शासनाचे पाठबळ

पुणे : ग्रँड टूर – २०२६ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ चे यजमानपद

IND vs SL Galle Test : गॉल कसोटी जिंकण्यासाठी भारताला सहा बळींची आवश्यकता

गॉल : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने

FIFA Leadership Crisis : फिफाची मोठी कारवाई, सीओओ केविन लार्मर यांना हटवले

नवी दिल्ली : फिफा, या जागतिक नियामक संस्थेने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), केविन लार्मर यांच्याशी संबंध

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा