
स्मार्टफोनचा वापर
एका सर्वेक्षणानुसार भारतात केवळ २४ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत. तर ४० टक्के लोक मोबाईल फोनचा वापर करतात. संचार तसेच ग्रामीण विकास राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी गेल्या वर्षी लोकसभे एका प्रश्नावर लिखित उत्तरात सांगितले की देशात ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६४४१३१ गावांमध्ये साधारण ६,२३, ६२२ गावांमध्ये मोबाईल कव्हरेज आहे. देशात मोबाईलचा वापर करणाऱ्यांची संख्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ११५.१२ कोटी झाली आहे.

नाशिक : ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून अनेक जणांना सुमारे दोन कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या ...
किती वेळ मोबाईलचा वापर केला पाहिजे
आता प्रश्न हा आहे की मोबाईल फोनचा वापर किती वेळ केला पाहिजे. आजच्या काळात लोकांचा अधिकतर वेळ मोबाईलमध्ये जात असल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. तर तज्ञांनुसार मोबाईलचा वापर दिवसभरातून २ तासांपेक्षा अधिक करू नये. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. इतकंच नव्हे सातत्याने मोबाईल फोन पाहू नये. जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल तर डोळ्यांपासून कमीत कमी १८ इंच दूर ठेवला पाहिजे.
मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला आजारी पाडू शकतो. मोबाईलमधून रेडिएशन्स निघत असतात. दीर्घकाळ अशा गोष्टींच्या संपर्कात राहिल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. याशिवाय मोबाईल फोन जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का याबाबत संशोधन सुरू आहे.