Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Rahul Deshpande : राहुल देशपांडेला ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर

Rahul Deshpande : राहुल देशपांडेला ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर


पुणे : उत्कृष्ट गायक आणि अभिनेता राहुल देशपांडेने गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकलीच पण 'मी वसंतराव', 'अमलताश' सारखे चित्रपट आणि 'कट्यार काळजात घुसली' सारख्या नाटकांमधून त्याने त्याच्या अभिनयाची जादू देखील दाखवून दिली. काही दिवसांपूर्वी राहुलने "मी ब्रेक घेतोय, कंटाळा आलाय" असा एक व्हिडिओ शेअर केला होता. राहुलने प्रत्यक्षात करियरला ब्रेक लावला नसला तरी यूट्यूबच्या सहाय्याने तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. मात्र त्याला त्यांनी तात्पुरत्या कालावधीसाठी ब्रेक दिला आहे. रिफ्रेश होऊन २०२० मध्ये बुधवार शनिवार भेटू असेही त्याने म्हटले आहे. राहुलला या आधी पार्श्वगायनात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून आता त्याला ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.


/>


लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे ‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालय’ पुण्यात गेली २४ वर्षे रूग्णसेवेत कार्यरत आहे. त्यांचा तृतीय स्मृतीदिन ६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. त्याचे औचित्य साधून दीदींच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत अथवा वैद्यकीय सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यंदा पहिले वर्ष असून, पं. वसंतराव देशपांडे यांचा संगीत वारसा समर्थपणे पुढे नेणारे गायक राहुल देशपांडेला ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर केल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी दिली. पुरस्कार प्रदान सोहळा ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. तसेच या वेळी राहुल देशपांडे व प्रियांका बर्वे यांचा लाइव्ह कॉन्सर्ट पाहता येणार आहे.

Comments
Add Comment