Monday, October 20, 2025
Happy Diwali

Pm Modi-Trump : पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर केली चर्चा

Pm Modi-Trump : पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर केली चर्चा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांनी पहिल्यांदा फोनवर चर्चा केली. या फोन कॉलवर दोन्ही नेत्यांनी फोनकॉलवर भारत-अमेरिकेच्या नात्याबाबत चर्चा झाली. दोघांमध्ये क्वॉडच्या होणाऱ्या बैठकीसोबत अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली.

ट्रम्प यांच्या अमेरिकेतली निवडणुकीत शानदार विजयानंतर पंतप्रधान मोदींनी फोनवर बातचीत केली होती. ट्रम्प यांच्या विजयानंतर मोदींनी एक्सवर लिहिले होते की, माझे मित्र, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चांगली बातचीत झाली. त्यांना शानदार विजयाबद्दल खूप अभिनंदन केले. टेक्नॉलॉजी, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि अन्य क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील नाते अधिक मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा मिळून काम करण्याबाबत आशावाद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींची चिठ्ठी घेऊन अमेरिकेत गेले होते परराष्ट्रमंत्री

२० जानेवारी २०२५ला डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. परराष्ट्र मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींची चिठ्ठी घेऊन अमेरिकेत पोहोचले होते. दोन्ही नेत्यांदरम्यान अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. बातचीत करताना भारत-अमेरिका यांच्यातील नाते अधिक मजबूत करण्याबाबत सहमती झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >