Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीशाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला आणि...

शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला आणि…

मुंबई : कांदिवलीच्या एका खासगी शाळेला एक ई-मेल आला. या मेलमध्ये शाळेच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनाने लगेच जवळच्या पोलीस ठाण्याला ई-मेलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक तसेच आधुनिक डिटेक्टरच्या मदतीने शाळेच्या इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत शाळेत कुठेही बॉम्ब आढळला नाही. यामुळे ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mahakumbh 2025 : प्रयागराजच्या महाकुंभात विमान कंपन्यांची चंगळ!

शाळेला आलेल्या ई-मेलमध्ये अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. पण तपासणीअंती शाळेच्या इमारतीत तसेच आवारात कुठेही बॉम्ब नसल्याचे लक्षात आले. अखेरीस ई-मेलद्वारे अफवा पसरवण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पोलीस आता ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा सायबर तज्ज्ञांच्या मदतीने शोध घेत आहेत. ई-मेल पाठवणाऱ्याच्या विरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधी २३ जानेवारी जोगेश्वरीतील ओशिवरा भागातल्या एका शाळेला ई-मेल आला होता. या मेलमध्ये पण अफझल टोळीने इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. मेलमधील दावा पुढे अफवाच ठरली. पण खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ओशिवरात तसेच कांदिवलीत शाळेत जाऊन सखोल तपासणी केल्यानंतरच बॉम्बेबाबतचा दावा ही अफवा असल्याचा निष्कर्ष काढला आहे. आता दोन्ही प्रकरणांमध्ये मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपी एक आहे की वेगवेगळे आहेत हे तपास पूर्ण झाल्यावर लक्षात येईल; असे पोलिसांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -