Friday, May 23, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Chhava Movie Controversy : 'छावा' चित्रपटातील वादग्रस्त 'लेझीम नृत्याचा' सीन काढणार

Chhava Movie Controversy : 'छावा' चित्रपटातील वादग्रस्त 'लेझीम नृत्याचा' सीन काढणार

मुंबई : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. मात्र ट्रेलरमधल्या एका सीन वरून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता हा आक्षेपार्ह सिन चित्रपटातून काढून टाकल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे.



छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत नृत्य करत असताना या ट्रेलरमध्ये दाखवले होते. विविध संघटनांनी याविरोधात आक्षेप घेत आंदोलन करत हा सिन चित्रपटातून काढावा अशी मागणी केली होती.ती मागणी अखेर पूर्ण झाली आहे. याबाबत मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी छत्रपती उदयन राजे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी स्वत: काल निर्मात्यांना फोन केला होता. आजची त्यातली सकारात्मक बाजू अशी आहे, तो जो नाचण्याचा पार्ट होता तो त्यांनी काढून टाकला आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. तसेच छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी स्वतः देखील हा सीन हटवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.


मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी दोन दिवसापूर्वी या संदर्भात भूमिका मांडली होती. सामंत यांनी छावा चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!" अशी कठोर भूमिका मांडली होती. 'छावा' या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. छावा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र रिलीज होणार आहे.



Comments
Add Comment