Thursday, May 15, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक

दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक

नाशिक : ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास वर्षभरात दुप्पट नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून अनेक जणांना सुमारे दोन कोटी ३१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या कोल्हापूरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी समाधान साहेबराव हिरे (रा. अश्विनी सोसायटी, बिटकोजवळ, नाशिकरोड) हे व्यापारी असून, त्यांची कोल्हापूर येथील नितेशकुमार मुकुदास बलदवा यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते बलदवा यांनी हिरे यांना सांगितले की, तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईक किंवा तुमच्या मित्रांना पैसे गुंतवणूक करायचे असतील किंवा मार्केटमध्ये नवीन व्यवसाय करायचा असेल तर मला सांगा. बलदवा यांनी एकदिवस हिरे यांना फोन करून बलदवा दाम्प्त्य व त्यांचा एक पार्टनर नाशिकमध्ये येत असल्याचे सांगितले. त्यावेळी तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांना गुंतवणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलवा, असे त्यांनी सांगितले.


बलदवा यांच्यावर विश्वास असल्याने हिरे यांनी आपल्या मित्रांना याबाबत सांगितले. त्यानुसार नितेशकुमार मुकूदास बलदवा, दुर्गा नितेशकुमार बलदवा (दोघेही रा. आझादरोड, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) व त्यांचा साथीदार नजिम मोमीन (रा. बागल चौक, कोल्हापूर) या तिघांनी मिळून फिर्यादी हिरे यांची बिटको सिग्नलजवळील एका हॉटेलमध्ये येथे भेट घेतली.


त्यानतर त्याच्याशा वगवगळ्या विषयावर गप्पा मारुन त्याना ट्रेडिंग विषयी माहिती दिली. बलदवा यांच्यावर विश्वास ठेवून हिरे यांचे मित्रांनी त्यांच्या विविध बँक खात्यावर १ कोटी नव्वद लाख रुपये टाकले होते आणि ४१ लाख रुपये रोख स्वरूपात दिले


बलदवा दाम्पत्य व मोमीन यांनी फिर्यादी हिरे, त्यांचे मित्र व नातेवाईकांकडून वेळोवेळी ट्रेडिंगसाठी २ कोटी ३१ लाख रुपये घेतले. त्यानंतर या पैशांच्या मोबदल्यात अवघ्या वर्षभरात दामदुप्पट पैसे करुन देतो, असे सांगितले. आम्ही तिघांनी मिळून अनेकांचा खूप जणांचा फायदा करुन दिला आहे, तसा तुमचाही करुन देऊ. तुम्हाला देखील १५ टक्के पैशांचा परतावा भेटणार आहे.


हे पैसे आम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करुन त्यातून मिळणारा नफा तुमच्या बँक खात्यावर दररोज जमा करू, असे सांगून जास्त पैशांचा परतावा देण्याचे आमिष दाखविले. सुरूवातीला काही पैशांचा परतावा तीन महिन्यांमध्ये बलदवा यांनी परत केले. उर्वरित पैशांची मागणी केली असता दहा दिवसात देतो, पंधरा दिवसांत देतो असे सांगून तारखांवर तारखा दिल्या.


काही दिवसानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली व नंतर फोन घेणेही बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात हिरे यांच्या मित्रांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फिर्याद दिली. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत नाशिकरोड परिसरात घडला.


याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहे.

Comments
Add Comment