वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कामाला लागले आहेत. यावेळेस ट्रम्प यांच्या निशाण्यावर कोलंबिया आहे. ट्रम्प यांनी कोलंबियावर कर लादणे आणि ट्रॅव्हल बंदी घातली आहे. याचे प्रत्युत्तर म्हणून कोलंबियानेही अमेरिकेवर कर लादले मात्र काही तासांतच ते मागेही घेण्यात आले.
ट्रम्प यांचे म्हणणे आहे की कोलंबियाने अवैध प्रवाशांनी भरलेली अमेरिकेचे दोन जहाज माघारी पाठवले. यानंतर त्यांच्यावर कारवाई करताना कर आणि व्हिसा प्रतिबंध घालण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे की कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांच्या निर्णयामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचली आहे. ट्रम्पने अमेरिकेच्या बाजारात कोलंबियाच्या सर्व उत्पादनांवर २५ टक्के इर्मजन्सी कर लावला आहे. हा कर वाढून एका आठवड्याच्या आत ५० टक्केही होऊ शकतो. याशिवाय कोलंबिया सरकारचे अधिकारी आणि सहयोगींवर व्हिसा प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
अमेरिकेसमोर झुकले कोलंबिया सरकार
ट्रम्प यांनी म्हटले की ही तर फक्त सुरूवात आहे. आम्ही कोलंबिया सरकारची मनमानी करू देणार नाही. ज्या गुन्हेगारांना त्यांनी अमेरिकेला पाठवले आहे त्यांना सरकारला माघारी घ्यावेच लागेल.
आता अशी बातमी समोर येत आहे की कोलंबिया आपल्या नागरिकांना मागे घेण्यासाठी प्रेसिडेन्शियल विमान होंडूरासला पाठवेल. कोलंबियाच्या राष्ट्रपतींचे म्हणणे आहे की ते सन्मानासह आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जात आहेत.
कोलंबियाच्या सरकारने प्रवाशांनी भरलेले अमेरिकेन सैन्याचे दोन फ्लाईट्स लाँड होऊ दिले नव्हते. राष्ट्रपती पेट्रो म्हणाले की ट्रम्प यांची वागणूक योग्य नाही. अमेरिका प्रवाशांसोबत अशा पद्धतीने गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देऊ शकत नाही. प्रवाशांना योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे.