रत्नागिरी : रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भल्या पहाटेच मत्स्य व्यवसाय विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे जेट्टीच्या विकास आणि विस्ताराचा मार्ग खुला होण्यास मदत होणार आहे.
मंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिल्यानंतर राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा जेट्टी आणि आसपासच्या भागातील ३१९ अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावण्याची कारवाई केली होती.या नोटीसला अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही हे बघून राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.