Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडी

‘जीबीएस’ आजारासंदर्भात केंद्रीय पथकाची नियुक्ती

‘जीबीएस’ आजारासंदर्भात केंद्रीय पथकाची नियुक्ती

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुणे येथे गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या संशयास्पद आणि खात्री पटलेल्या रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि व्यवस्थापनात राज्य आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक उच्च-स्तरीय बहु-शाखीय पथक नियुक्त केले आहे.


महाराष्ट्रासाठीच्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निम्हान्स बेंगळुरू, पुणे येथील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) मधील सात तज्ञांचा समावेश आहे. एनआयव्ही, पुणे येथील तीन तज्ज्ञ आधीच स्थानिक प्रशासनाला मदत करत असून आता केंद्रीय पथकही दाखल झाले आहे.


हे पथक राज्याच्या आरोग्य विभागांबरोबर एकत्रितपणे काम करेल , प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची शिफारस करेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि राज्याबरोबर समन्वय साधून सक्रिय पावले उचलत आहे.

Comments
Add Comment