साप्ताहिक राशिभविष्य, २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५
![]() |
भाग्याची चांगली साथ मिळेलमेष : या सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आपले प्रयत्न कमी पडता कामा नयेत याची काळजी घ्या. जास्त परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो. संयम ठेवा. कार्य व्याप्ती वाढल्यामुळे कामाचा ताण जाणवू शकतो. त्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. दगदग होईल. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन बदल होऊ शकतात. ते अनुकूल ठरतील, त्याचबरोबर काही अतिरिक्त महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. कामानिमित्त लहान-मोठ्या प्रवासाचे योग येतील. प्रवास कार्य सिद्ध राहतील. भाग्याची चांगली साथ मिळेल. कामामुळे थोडा ताणतणाव राहू शकतो. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. |
![]() |
प्रश्न संपुष्टात येतीलवृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची शक्यता राहील. कामाचा थोडा ताण जाणवू शकतो मात्र त्यातून फायदा होणार आहे हे लक्षात ठेवा. व्यवसाय-धंद्यामधील नियोजन यशस्वी झाल्यामुळे कामाचे प्रमाण वाढेल. मदतीची आवश्यकता भासेल. मदत उपलब्ध होईल. नवीन तंत्रज्ञान, नवीन संकल्पना यांचा यशस्वी वापर व्यवसायात होईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. मंगल कार्याचे नियोजन होऊ शकते. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात थोडी दगदग होऊ शकते. भावंडांशी सर्वसामान्य संबंध राहतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना राहून समन्वय राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. |
![]() |
अंदाज बरोबर ठरतीलमिथुन : व्यवसायामधली परिस्थिती बदलून आपले पूर्वीचे नियोजन प्रत्यक्षात उतरत असल्याचे बघून समाधान वाटेल. आपले अंदाज बरोबर ठरतील. त्यामुळे व्यवसाय-धंद्यामध्ये लाभ होईल. व्यवसायाची पद्धत बदलता येईल. उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. प्रत्यक्षात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज लागेल. बावन डॉक्टरांच्या गाठीभेटी होतील. त्यांना आपण मदत करू शकाल. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कुटुंबातील वाद-विवाद मिटवण्यात आपला पुढाकार राहील. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये योग्य ती काळजी घेणे गरजेचे ठरेल. |
![]() |
नवीन करार-मदार होतीलकर्क : व्यवसाय-धंद्यामध्ये तसेच नोकरीतही चांगल्या संधी मिळतील. त्यातून आर्थिक फायदा मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती, वेतन वृद्धी सारख्या घटना घडू शकतात मात्र बदलीची शक्यता. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. व्यवसाय-धंद्यात एखादा चांगला फायद्याचा सौदा हाती येऊ शकतो. नवीन करार-मदार होतील. उलाढाल वाढली. नवीन व्यावसायिक नाती निर्माण होतील. भागीदारी व्यवसायात भागीदाराचे मत लक्षात घेतल्यामुळे फायद्यात राहाल. कुटुंब-परिवारात भावंडांची सख्य राहील. जीवनसाथीबरोबर मधुर संबंध राहतील. कुटुंबातील मुलांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक कराल. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील. |
![]() |
एखादे महत्त्वाचे स्थान मिळेलसिंह : आपल्या सभोवतालचे वातावरण अनुकूल राहील. थोड्याच प्रयत्नांनी आपली दैनंदिन कामे सहज होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. कुटुंबातील सदस्यांचे तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळेल. सरकारी स्वरूपाची कामे होतील. स्थावर मालमत्ता तसेच जमीन-जुमला याविषयीची थांबलेली कामे गतिमान होती. एखादे महत्त्वाचे स्थान मिळेल. आरोग्य चांगले राहून उत्साह वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद-विवाद शमतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला कार्यरत होईल. आर्थिक फायदा होऊ शकतो. |
![]() |
वादविवाद टाळाकन्या : नोकरीमध्ये बदल घडू शकतात. नवीन नोकरी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. चालू नोकरीमध्ये बदलीची शक्यता तसेच कामाच्या स्वरूपातही बदल होऊ शकतो. कधी कधी मना विरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतात हे लक्षात ठेवा पण नाराज न होता कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंब परिवारात भावंडांची तसेच आपल्या जीवनसाथीबरोबर वादविवाद टाळा. इतरांना दोष देऊ नका. कामाविषयीचे आपले ज्ञान अद्ययावत ठेवा. तसेच नियम व शिस्त पाळा. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. |
![]() |
व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेलतूळ : या सप्ताहात नोकरीविषयक काही आश्चर्यजनक घटना घडतील. नोकरीमध्ये आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. पदोन्नती, वेतन वृद्धी होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये आपण केलेल्या कामगिरीचे कौतुक होईल. बक्षीस मिळेल. इतरांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना परदेशगमनाचे योग. कलाकार, खेळाडू यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे नियोजन करू शकाल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन बदल करण्याची इच्छा होईल. |
![]() |
रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतीलवृश्चिक : नोकरीधंद्यात तसेच व्यवसायात आपले वर्चस्व वाढेल. आपण घेतलेले निर्णय अचूक आणि बरोबर ठरल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होईल. आपले अनुकरण इतर करतील. आपल्या कार्यशैलीचा प्रभाव इतरांवर पडेल. नोकरीत पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकते. वरिष्ठांचे संबंध सुधारतील. तसेच हाताखालील सहकाऱ्यांचे कार्य मिळत राहील. आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. ओळखी मध्यस्थी यशस्वी होते. बरेच दिवस रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. वाद-विवाद संपुष्टात येतील. |
![]() |
जीवनसाथीशी मधुर संबंध राहतीलधनू : मागील काही दिवस आपल्या मनावर आलेले ताण अथवा एखादी गुप्त चिंता संपुष्टात येईल. अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीची मधुर संबंध राहतील. वडिलोपार्जित संपत्ती विषयीची कामे करताना वाद-विवाद होण्याची शक्यता. शांत राहण्याची गरज. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या कामात उपयोगी पडू शकतो. भावंडांची वादविवाद करू नका. व्यवसाय धंद्यामध्ये सर्वसामान्य परिस्थिती राहील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये अनुकूलता वाढेल. विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. |
![]() |
आरोग्याची काळजी घ्यामकर : या सप्ताहात आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये अनुकूल वातावरण राहील. आर्थिक आवक चांगली राहील. यामुळे खर्च देखील मनाप्रमाणे करू शकाल मात्र थोडे काळजीचे विचार असतील. कुटुंबातील मुला-मुलींना यश मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल. सहकुटुंब, सहपरिवार मित्रमंडळींच्या समवेत एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. देवदर्शन होईल, पूजा पाठांमध्ये मन रमेल. त्यामुळे एखादी चांगली अनुभूती येऊ शकते. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. खाणे-पिणे सांभाळा. पथ्य पाळा. नोकरीमध्ये राजकारण आणि गटबाजीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता. आपण स्वतः शांत रहा. |
![]() |
संयम व प्रयत्न आवश्यक आहेतकुंभ : या कालावधीमध्ये आपल्याला अनेक मार्गांनी लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. तसेच उसने दिलेले पैसे परत मिळतील परंतु अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे ठरेल. महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. संयम व प्रयत्न आवश्यक आहेत. काहींना प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण ठेवा. कुटुंब परिवार तसेच आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या रागावर नियंत्रण हवे. रागाच्या भरात इतरांचा अपमान करू नका. इतरांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. आनंदी राहण्याचा मनाचा स्थायीभाव बनवा. कुटुंब परिवार मुलांच्या यशाच्या बातम्या कानावर येतील |
![]() |
जुन्या गुंतवणुका फलद्रूप होतीलमीन : आर्थिक आलेख उंचावत राहील. नोकरीत पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकेल. उत्पन्नात भरघोस वाढ होईल. तसेच जुन्या गुंतवणुका फलद्रूप होतील. नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल. तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील. आर्थिक आवक चांगली राहील. यामुळे व्यवसायामध्ये बदल करू शकाल. व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरेल. स्पर्धकांवर विजय मिळवाल तसेच शत्रू व हितशत्रू वर विजय संपादित करता येईल; परंतु नको त्या मार्गाचा अवलंब करू नका. सरकारी कायदे कानून पाहणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य वाढेल. आपुलकीची भावना निर्माण होईल. गाठीभेटी होतील. |