

मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने चौदा हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या कोस्टल रोड अर्थात धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी ...
बुधवारी पोटात दुखत असल्याचे कारण सांगितल्यानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. आता पुन्हा एकदा वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. मुंबईमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी बोलताना वाल्मिक कराडसह सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. पोटदुखी आणि स्लिप अॅप्नियासाठी आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज काय ? असाही प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. वाल्मिक कराडवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी अंजली दमानिया यांनी केली. आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्यांचीही चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली. यानंतर वाल्मिक कराडची पुन्हा बीड जिल्हा कारागृहात रवानगी झाली.