Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेRepublic Day 2025: ठाणे महापालिकेच्यावतीने ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day 2025: ठाणे महापालिकेच्यावतीने ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ठाणे: भारतीय प्रजासत्ताकाचा ७६वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने रविवारी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली.

राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

ध्वजवंदनानंतर, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला. लक्ष्मी भिमपा वालकरी, हरिश्चंद्र अण्णा डोंगरे, अनंत गणपत जाधव, दिनेश शांताराम महाडिक, अशोक बाळाराम पाबरे, बानू जयराम घुमाडिया, संतोष शंकर शिंदे, उषा अरुण पाटील, भाग्यश्री भगवान गायकवाड, लता जर्नादन गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास ‘डूडल’

ध्वजवंदन सोहळ्यास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदी मोठ्या उपस्थित होते. प्रांगणातील सोहळ्यानंतर, महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याबरोबरच, महापालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तसेच, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -