काव्यरंग : केतकीच्या बनी तिथे...

केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर

पापणीत साचले अंतरांत रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला गं आसावला सूर

भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यांतुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियांत पाहिले कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्निच्या सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर

गीत : अशोक जी. परांजपे
स्वर : सुमन कल्याणपूर


नकोच घालू बांध मनाला


नकोच घालू बांध मनाला
अंधारातून उगवून ये
श्वासाना दे लयीत जागा
पाय जरासे दमवून घे
फार कशाला प्रश्न उशाला
स्वप्नांना दे जाग नवी
जुन्या पुराण्या अचल रूढींना
चला लाऊया आज चुढी
हसत लकेरी घेत चालली
सोंनपावली पाहट कशी
वेलीवरती दवविंदूची
लबाड लाडिक खोडी अशी
पाहा उगवला सूर्य नवा अन्
अंधार पसरला मनामध्ये
घे श्वासांना स्पंदनात अन्
साकार कर तुझे स्वप्न नवे

-दीपाली पंडित, राजापूर

Comments
Add Comment

दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्ती

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे दोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस

सुगंध कर्तृत्वाचा

स्नेहधारा : पूनम राणे इयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि

स्त्रीधन

क्राइम : अॅड. रिया करंजकर समाजामध्ये नजर टाकली, तर लग्न टिकवण्यापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत

देवराई

देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही. पण ही संकल्पना फक्त देवाचे राखीव जंगल किंवा देवाचे वन एवढ्यापुरती न

अच्छा लगता हैं!...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे आपण नेहमी आपल्याला आवडलेल्या गाण्यांना ‘जगजीत सिंगची गझल’, ‘चित्रा सिंगची

क्षमा आणि शिक्षा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर संत एकनाथांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा एकनाथ महाराज नदीवरून स्नान करून येत असताना