Tuesday, August 26, 2025

काव्यरंग : केतकीच्या बनी तिथे...

काव्यरंग : केतकीच्या बनी तिथे...
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर पापणीत साचले अंतरांत रंगले प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ओठांवरी भिजला गं आसावला सूर भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यांतुनी कुणी आज भावगीत बोलले डोळियांत पाहिले कौमुदीत नाचले स्वप्नरंग स्वप्निच्या सुरासुरांत थांबले झाडावरी दिसला गं भारला चकोर

गीत : अशोक जी. परांजपे स्वर : सुमन कल्याणपूर

नकोच घालू बांध मनाला

नकोच घालू बांध मनाला अंधारातून उगवून ये श्वासाना दे लयीत जागा पाय जरासे दमवून घे फार कशाला प्रश्न उशाला स्वप्नांना दे जाग नवी जुन्या पुराण्या अचल रूढींना चला लाऊया आज चुढी हसत लकेरी घेत चालली सोंनपावली पाहट कशी वेलीवरती दवविंदूची लबाड लाडिक खोडी अशी पाहा उगवला सूर्य नवा अन् अंधार पसरला मनामध्ये घे श्वासांना स्पंदनात अन् साकार कर तुझे स्वप्न नवे

-दीपाली पंडित, राजापूर

Comments
Add Comment