Thursday, May 15, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मधील रोमहर्षक विजयानंतर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया व्हायरल

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मधील रोमहर्षक विजयानंतर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया व्हायरल

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना शनिवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. सामन्यात टीम इंडियाने २ विकेटनी विजय मिळवला. सामना अतिशय रोमहर्षक झाला. या सामन्यात तिलक वर्माने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.


तिलक शेवटपर्यंत उभा राहिला आणि त्याने भारताला सामना जिंकून दिला. टीम इंडियाला शेवटच्या षटकांत ६ धावा हव्या होत्या आणि २ विकेट बाकी होते. या रोमहर्षक सामन्यात विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमारने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.


सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर म्हटले, ज्या पद्धतीने खेळ होत होता त्यातून थोडा दिलासा मिळाला. आम्ही विचार केला की १६० चांगली टोटल होईल. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. चांगले झाले की खेळ शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. आम्ही गेल्या २-३ मालिकेपासून अतिरिक्त गोलंदाजासोबत खेळत आहे. आम्ही तेच कायम ठेवले. चारही बाजूला खेळण्याबाबतच चर्चा सुरू होती कारण आम्ही शेवटचा गेम खेळलो होतो. आम्ही क्रिकेट आक्रमक खेळत आहोत माक्ष जशी स्थिती झाली मुलांनी खरंच आपले हात पुढे केले आणि छोटी छोटी भागीदारी केली.


पुढे अक्षऱ पटेल बाद झाल्यावर आणि तिलक वर्माबाबत प्रतिक्रिया देताना सूर्या म्हणाला, मी आतमध्ये बसलो होतो. थोडाचा अंधश्रद्धाळू आहे. या सर्व गोष्टी खेळाचा भाग आहेत. तुम्ही शिकत आहात, पुढे जात आहात. तिलकच्या फलंदाजीने शुख आहे. कोणीतरी जबाबदारी घेतली हे पाहून आनंद वाटला.


पुढे सूर्या म्हणाला, अनुभव खूप चांगला होता. मुलांनी माझ्यावरचा दबाव हटवला. यासाठी मी जाऊ शकतो आणि स्वत:ला एक्सप्रेस करू शकतो. वातावरण चांगले होते. ड्रेसिंग रूमध्ये लाईट वातावरण होते.

Comments
Add Comment