

मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. यंदा सात मान्यवरांना पद्मविभूषण आणि १९ ...
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी येतात. पण अजित पवार हे पुणे आणि बीड अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. यामुळे प्रजासत्ताक दिनी ते पुण्यात होते आणि बीड जिल्ह्यात मंत्री दत्तात्रय भरणे राष्ट्रध्वजाला सलामी देतील, असे जाहीर करण्यात आले. शासकीय नियोजनानुसार भरणे यांनी शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यानंतर त्यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाला. ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या जवळ पोहोचताच तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

वडिलांचा मृत्यू सहन न झाल्याने मुलीनेही संपवले जीवन
नाशिक : उपचारासाठी दाखल केलेल्या वडिलांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच दुःखी झालेल्या तरुणीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने तिचा दुर्दैवी ...
बीड नगरपालिकेतील घोटाळ्याची चौकशी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा, ही मागणी करण्यासाठी तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समजले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

डंपर-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू तर तीनजण जखमी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ...
मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा सतत चर्चेत आहे. आधी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार आहे. इतर आरोपी कोठडीत आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. आता तरुणाच्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा बीडमधील कारभाराची चर्चा सुरू झाली आहे.