जगातील सर्वात उंच रेल्वे रुळावरुन धावली वंदे भारत एक्सप्रेस

कटरा : जम्मू काश्मीर फिरू इच्छिणाऱ्या तसेच वैष्णो देवीच्या दर्शनाला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता दिल्ली - श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसद्वारे वेगाने, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. भारतीय रेल्वेने शनिवार २५ जानेवारी २०२५ रोजी कटरा ते श्रीनगर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी घेतली. चाचणी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस जगातील सर्वात उंच अशा चिनाब रेल्वे पुलावरुन आणि देशातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पूल अंजी खडवरुन धावली. वंदे भारत एक्सप्रेसची शनिवारची चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता दिल्ली ते श्रीनगर हा प्रवास लवकरच जगातील सर्वात उंच अशा चिनाब रेल्वे पुलावरुन तसेच देशातील पहिल्या केबल-स्टेड अंजी खड रेल्वे पुलावरुन होऊ शकेल.



चिनाब रेल्वे पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी दरम्यान आहे. हा पूल चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे तसेच हा जगातील सर्वात उंच कमानी पूल आहे. जम्मू काश्मीरमधील थंड वातावरणाचा विचार करुन वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे गाडी थंडीच्या दिवसांतही आरामात प्रवास करू शकेल.



वंदे भारत गाडीची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर परदेशातही वाढू लागली आहे. अनेक देशांनी भारतातून सेमी-हायस्पीड वंदे भारत आयात करता येतील का ? याबाबत चौकशी सुरू केली आहे.



भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर धावली. ही गाडी ताशी १६० किमी वेगाने धावली. यानंतर वंदे भारत गाड्या देशात वेगवेगळ्या मार्गांवर धावू लागल्या आहेत. वंदे भारतच्या काचेवर कधीही बर्फ जमा होत नाही. ही गाडी उणे ३० अंश से. तापमानातही धावू शकते. या गाडीची काही वैशिष्ट्ये विमान प्रवासाशी मिळतीजुळती आहेत. यामुळे वंदे भारत गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
Comments
Add Comment

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू