नवी दिल्ली : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची पाऊले उचलत असते. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील तीन मोठ्या बँकांनी निर्देशांचे पालन न केल्याबाबत चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये सहकारी बँकांचाही समावेश आहे.
Goregaon Fire : गोरेगावमधील खडकपाडा फर्निचर मार्केट परिसरात भीषण आग!
आरबीआयने जम्मू आणि काश्मीर बँक (J&K बँक), बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि कॅनरा बँकेला (Canara Bank) नियम न पाळल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर कॅनरा बँकेवर १.६३ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) द्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील आचारसंहितेचे पालन न केल्याबद्दल डॅटसन एक्सपोर्ट्स पश्चिम बंगालला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, प्राईव्हेट सेक्टरमधील जम्मू-काश्मीर बँकेला कर्जा संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी J&K बँकेवर ३.३१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ग्राहकांवर होणार परिणाम?
नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना दंड ठोठावला आहे. मात्र या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही. बँकेसोबतचे ग्राहकांचे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरळीत राहतील. तसेच बँकेने ग्राहकांना दिलेल्या सेवांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.