Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Matheran Fire : माथेरानच्या गारव्यात अग्नितांडव!

Matheran Fire : माथेरानच्या गारव्यात अग्नितांडव!

रायगड : माथेरान मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरान घाटात आज बर्निंग कारचा थरार (Matheran Fire) पाहायला मिळाला. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरानला पर्यटकांची मंदियाळी पाहायला मिळते आहे. माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाट चढत असताना अचानक आग लागली. या आगीत कार चालक आणि त्याची प्रेयसी अडकली होती. प्रसंगावधान राखत जीव मुठीत घेऊन दोघांनीही आपला जीव वाचवण्यासाठी गाडीतून उडी मारली. टनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले होते. तर दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखण्यात आल्याने घाटात पर्यटकांच्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.


नवी मुंबई बेलापूर येथील राहणारे ऍड. सचिन सोनावळे हे आपल्या खासगी डस्टर चारचाकी वाहनातून माथेरान फिरण्यासाठी म्हणून प्रेयसी सोबत आले होते. नेरळ येथून माथेरान घाट चढत असताना गारबट येथील रस्त्याच्या चढावावर अचानक कारच्या पुढील इंजिन बाजूने धूर निघायला लागला. आणि काही क्षणातच आगीने पेट घेतला. दरम्यान वाहन चालवणारे ऍड. सोनवणे यांनी लागलीच हुशारी दाखवत रस्त्याच्या कडेला कार पार्क करून दोघे बाहेर पडले. यावेळी जीव मुठीत घेवून पळणारे सोनवणे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली. तर स्थानिक वाहन चालक नागरिकांनी यावेळी धाव घेत त्यांना बाजूला करीत त्यांचे प्राण वाचविले आहे.


आग आटोक्यात आणण्यासाठी माथेरान नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी येण्यासाठी फोन केला असता वाहन चालवण्यासाठी हक्काचा नियोजित चालकच नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान माथेरान अग्निशमन वाहनास तात्पुरता चालक मिळाल्यावर दोन तासानंतर हे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. (Matheran Fire)

Comments
Add Comment