
औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अचानक हिंदुत्व आठवले… ते हवं तेव्हा हिंदुत्वाचा मुखवटा लावतात आणि एरवी तो खुंटीवर टांगून ठेवतात... लांगूलचालन करत उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? पाकिस्तानी झेंडे डोळ्यासमोर नाचवले गेले तेव्हा कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? व्होट जिहाद करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर मशीद उभारण्यापर्यंत घोषणा करताना कुठे गेले होते उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व ? वक्फ बोर्डाच्या मुद्यावर बोलणे टाळायचे आणि जनतेने विरोधात कौल दिला की तो अमान्य करायचा ही उद्धव ठाकरेंची जुनीच खोड आहे. आता उद्धव ठाकरेंना सूड घ्यायचा आहे... कोणाचा ? जनतेचा ? वारंवार गद्दार - खंजीर सारखी भाषणं करणं आणि रोज सकाळी माध्यमांवर तुमच्या भोंग्याला सोडणं हा जनतेवर उगवला जाणारा सूडच आहे. बाकी विकास आणि प्रत्यक्ष काम याचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबध नाही हे जनता देखील जाणते; या शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.Chitra Wagh | 'उद्धव ठाकरेंचा विकासाशी संबंध नाही' @ChitraKWagh | #prahaarnewsline #chitrawagh #marathinews pic.twitter.com/ZYargoAr0r
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) January 24, 2025

Ashish Shelar : अरेरे! शेलारांनी तर उधोजींची उरलीसुरली काढून टाकली!
तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल वळ आहेत, ते मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा! मुंबई : अंधेरीत झालेल्या मेळाव्यात अमित शाह यांच्यावर टीका ...

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर १६ जिल्ह्यांची जबाबदारी
मुंबई : महायुती सरकारने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर केल्यानंतर भाजपाने नव्या प्रयोगाची तयारी सुरू केली आहे. राज्यातील २० ...