Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीUttarakhand : उत्तरकाशीत भूकंपाचे ३ धक्के!

Uttarakhand : उत्तरकाशीत भूकंपाचे ३ धक्के!

डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये आज, शुक्रवारी सकाळी भूकंपाचे तीन धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५  इतकी मोजण्यात आली. हा भूकंप भूगर्भात ५ किलोमीटर खोलीवर झाल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले.

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल

उत्तरकाशीला आज सकाळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले. यामुळे लोक घाबरून घराबाहेर आले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. त्याचे केंद्र उत्तरकाशीत होते. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे होते. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, उत्तरकाशीत सकाळी ७.४१ वाजता भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. यानंतर आणखी एक धक्का बसला. तर सकाळी ८ वाजून १९ मिनीटांनी भूकंपाचा तिसरा धक्का बसला. सलग बसलेल्या या भूकंपांच्या धक्क्यामुळे लोक घराबाहेर पडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -