मुंबई: जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान्स उपलब्ध असतात. येथे तुम्हाला बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लान्सबद्दल सांगत आहोत. जिओचा २०९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला भरपूर फायदे मिळतील. यात कॉल, डेटा आणि एसएमएस इत्यादीचा समावेश आहे.
जिओ पोर्टलवर लिस्टेड डिटेल्सनुसार, २०९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २२ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओच्या २०९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १ जीबी डेटा मिळेल. येथे संपूर्ण व्हॅलिडीटीदरम्यान मिळेल. युजर्सला या प्लानमध्ये एकूण २२ जीबी डेटा मिळेल.
जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल एसीटीडी कॉलचा समावेश आहे. जिओच्या या परवडणाऱ्या प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस वापरण्यास मिळतात.
जिओच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लीमेंट्रीचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळेल. जिओचा २४९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात युजर्सला २८ दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज १ जीबी डेटा मिळेल.