India Energy Week 2025 : भारत ऊर्जा सप्ताह २०२५ हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम ठरेल

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे प्रतिपादन


मुंबई : भारत ऊर्जा सप्ताह २०२५ (आयईडब्ल्यू) हा एक लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर आयोजित कार्यक्रम, सहभाग, प्रदर्शन स्थळाची भव्यता आणि त्यातील सत्रांमुळे जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले.


नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमीवर 11 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आयईडब्ल्यू 2025 मध्ये मंत्री, सीईओ आणि उद्योग धुरीण यांच्याकडून अतुलनीय जागतिक सहभागाचे आश्वासन देण्यात आले आहे, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण होईल.


माध्यमांशी संवाद साधताना, मंत्र्यांनी आयईडब्ल्यू 2025 च्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या क्लीन कुकिंग मिनिस्टरियल कार्यक्रमावर प्रकाश टाकला. हा कार्यक्रम स्वच्छ स्वयंपाक उपायांचा जागतिक स्तरावर स्वीकार वाढवण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना बळकटी देणारा एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करेल. भारताची अत्यंत यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) कार्यक्रमाचा गाभा असून ती ऊर्जा उपलब्धता आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक नमुना म्हणून मौल्यवान दृष्टिकोन आणि सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करेल.


आयईडब्ल्यू 2025 मध्ये मागील कार्यक्रमांच्या तुलनेत व्याप्ती आणि सहभागात उल्लेखनीय वाढ होईल. प्रदर्शनाची जागा 65% ने अधिक म्हणजे 28,000 चौरस मीटर असेल, तर परिषदेच्या सत्रांची संख्या 105 पर्यंत वाढेल आणि जागतिक प्रतिनिधींची संख्या 70,000 पेक्षा जास्त होईल. प्रमुख आंतरराष्ट्रीय वक्त्यांसह 500 हून अधिक वक्ते यात सहभागी होतील जे कार्यक्रमाच्या वाढत्या जागतिक महत्वाचे द्योतक आहे. या परिषदेत अमेरिका, ब्रिटन, रशिया, जपान, जर्मनी आणि नेदरलँड्स सारख्या आघाडीच्या 10 देशांची हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, जैवइंधन आणि पेट्रोकेमिकल्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आठ संकल्पनात्मक क्षेत्रातील दालने असतील.



या कार्यक्रमात 20 हून अधिक परराष्ट्र ऊर्जा मंत्री किंवा उपमंत्री, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि फॉर्च्यून 500 ऊर्जा कंपन्यांचे 90 सीईओ सहभागी होतील. हे जागतिक ऊर्जा संक्रमण विचारमंथनाला आकार देण्यात भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतिबिंब आहे. आघाडीच्या आयआयटी, अविन्या आणि वसुधा सारख्या स्टार्टअप प्लॅटफॉर्मसह तरुणांना आणि नवोन्मेषकांना सहभागी करण्याच्या उपक्रमांवर पुरी यांनी प्रकाश टाकला; आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञान-चालित उपाय प्रदर्शित करण्यासाठी दिल्ली/एनसीआर मधील 500 विद्यार्थी सहभागी होतील असे सांगितले.


ऊर्जा सुरक्षा, न्याय्य आणि सुव्यवस्थित संक्रमणे, सहकार्य, लवचिकता, क्षमता बांधणी आणि डिजिटल प्रगती यासारख्या आकर्षक विषयांवर लक्ष केंद्रित करणे हे आयईडब्ल्यू 2025 चे एक प्रमुख आकर्षण आहे. या सोहोळ्यातील स्वच्छ स्वयंपाक विषयक कार्यक्रम शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा उपायांपर्यंत पोहोच सुनिश्चित करण्यात भारताच्या नेतृत्व भूमिकेला आणखी बळकटी देईल, ऊर्जा समतेसाठी जागतिक वचनबद्धतेची पुष्टी करेल.


अतुलनीय व्याप्ती आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करून, भारत ऊर्जा सप्ताह 2025 हा जागतिक ऊर्जा संक्रमणांमध्ये भारताला आघाडीवर ठेवण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रातील बदलासाठी उत्प्रेरक म्हणून त्याची भूमिका मजबूत करण्यास सज्ज आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांच्या सेवेत १८ डब्यांची लोकल लवकरच!

विरार-डहाणू रोड सेक्शनवर १४-१५ जानेवारीला चाचणी मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास

महापौर, गटनेते, अध्यक्ष यांच्या दालनाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

येत्या १५ दिवसाच्या आत सर्व दालने सुस्थितीत करून ठेवा, असे दिले निर्देश मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या

मुंबईत २०२६ च्या अखेरीस सुरू होणार जोगेश्वरी टर्मिनस

मुंबई : मुंबईत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे

Santosh Dhuri on Raj Thackeray : "राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर, मनसेवर आता उद्धव ठाकरेंचा ताबा!"; भाजप प्रवेशानंतर संतोष धुरींची पहिलीच डरकाळी

मुंबई : मुंबईच्या राजकारणात मंगळवारी मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायरब्रँड नेते आणि

Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या

बनावट एबी फॉर्मचा आरोप न्यायालयात; सायन कोळीवाडा वादावर उच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार

मुंबई : महापालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सायन कोळीवाडा मतदारसंघातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात