Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Wardha News : ५१ म्हशींची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, पाच जण अटकेत

Wardha News : ५१ म्हशींची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, पाच जण अटकेत

वर्धा : अवैधरित्या वाहतूक करणारे कंटेनरमध्ये जनावरे भरून घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अटक करून ४७ लाख ७५ हजार रुपंयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोदय गोशाळा पडेगाव येथे दाखल करण्यात आले.





४७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकने समृद्धी महामार्गावर विरुळ परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली. त्यात म्हैस वर्गीय ५१ जनावरांना अवैधरीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी १२ लाख ७५ हजार रुपयांची म्हैस वर्गीय ५१ जनावरे, तसेच कंटेनर असा ४७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.




पुढील तपास सुरू


ही जनावरे अकबर अली जलाउद्दीन रा. ईलीपाकोनथ्थु, जि. त्रिवेंद्रमपुरम (केरळ) (पसार) याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागरकुमार कवडे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, हमीद शेख, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अभिषेक नाईक, शिवकुमार परदेशी, अखिलेश इंगळे, रितेश गेटमे यांनी केली.

Comments
Add Comment