Sunday, October 26, 2025
Happy Diwali

...म्हणून वाल्मिक कराडने मागे घेतला जामीन अर्ज

...म्हणून वाल्मिक कराडने मागे घेतला जामीन अर्ज
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि एका खंडणी प्रकरणाचा संबंध आहे, असा आरोप तपास पथकाने केला. यानंतर न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी ठोठावली. या कोठडीचा कालावधी संपला म्हणून वाल्मिकला २२ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्यावर मकोका अंतर्गत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ही कोठडी मिळाल्यावर जामिनाचा अर्ज करणाऱ्या वाल्मिकने आता अर्ज मागे घेतला आहे.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर काही तासांतच वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यामुळे वाल्मिकला बीड जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वाल्मिकने जामीन अर्ज मागे घेतला. मकोका अंतर्गत तपास पथक अनेकदा आरोपींना किमान १८० दिवस जामीन मिळत नाही. न्यायालयीन कोठडी मकोका अंतर्गत देण्यात आल्यामुळे आता जामीन मिळणे कठीण आहे याची जाणीव वाल्मिकला झाली. यानंतर त्याची तब्येत बिघडली. रुग्णालयात दाखल झाल्यावर वाल्मिकने जामीन अर्ज मागे घेतला. कायद्यातील तरतुदीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण यात आवश्यकता भासल्यास न्यायालयाच्या परवानगीने तपास पथक आरोपी वाल्मिक कराडची चौकशी करू शकेल.
Comments
Add Comment