मुंबई: अफवा या आगीप्रमाणे पसरतात. महाराष्ट्रात बुधवारी याच अफवेने अनेकांचे बळी घेतले. लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी चेन पुलिंग करून रेल्वे थांबवली. प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याच वेळेस दुसऱ्या दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना १.५ लाख रूपये आणि गंभीर जखमींना ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे.
लखनऊ येथून पुष्पक एक्सप्रेस वेगात मुंबईच्या दिशेने जात होती. बुधवारी संध्याकाळी ४.४२ची वेळ होती. ट्रेन मुंबईच्या ४२५ किमी आधी जळगावच्या पाचोरा स्थानकाच्या जवळ पोहोचली होती. यावेळेस अचानक पुष्पक एक्सप्रेसच्या बी४ बोगीतून धूर निघताना दिसला. यावेळेस अफवा पसरली की बोगीमध्ये आग लागली. या अफवेमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी लोकांनी इमरजन्सी चेन खेचली आणि ट्रेन थांबवली. यावेळेस प्रवासी रेल्वेतून खाली उतरले मात्र त्याचवेळेस दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. हा अपघात अंगावर काटे आणणार होता. अनेक मृतदेह इतरस्त्र पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला जात असलेली पुष्पक एक्सप्रेस जळगावच्या पाचोरा स्टेशनजवळ पोहोचली होती. पुष्पक एक्सप्रेसच्या बी ४ बोगीमधून धूर निघताना पाहिल्याने लोकांनी आग लागल्याची अफवा पसरवली. यावेळेस चेन खेचण्यात आली. चेन खेचून अनेक प्रवासी पुष्पक एक्सप्रेसमधून उतरून दुसऱ्या ट्रॅकवर उभे राहिले. यावेळेस दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना धडक दिली.
या दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाले. ही रेल्वे दुर्घटना उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरावळ माहेजी आणि परधाडे स्थानकादरम्यान घडला