Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!

Nitesh Rane : मुंब्राचे जीतुद्दीन आणि बारामतीच्या ताईंना फक्त खान कलाकारांची काळजी!

सैफवरील हल्ल्यावर मंत्री नितेश राणे यांचे वक्त्व्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मागच्या आठवड्यात चाकू हल्ला झाला. त्यामध्ये सैफ गंभीररित्या जखमी झाला होता. वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सैफचा फिटनेस पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असताना या हल्ल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे.

Mumbai Rani Baug : राणी बागेतील झाडे एका क्लिकवर पाहता येणार!

‘जेव्हा कोणत्याही खानला दुखापत होते तेव्हा सर्वजण त्याबद्दल बोलू लागतात. मात्र सुशांत सिंग राजपूत सारख्या हिंदू अभिनेत्यावर अत्याचार होतात तेव्हा कोणीही काहीही बोलण्यासाठी पुढे येत नाही’. मुंब्राचे जीतुद्दीन (जितेंद्र आव्हाड) आणि बारामतीची ताई (सुप्रिया सुळे) यांना कधी हिंदू कलाकाराची काळजी करताना पाहिले नाही. मात्र कोणत्याही खानला सुखापत झाली तर त्यांना काळजी वाटते, असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी केला.

त्याचबरोबर सैफला बघितल्यावर त्याला खरच चाकू मारला की अॅक्टिंग करतोय असा संशय येत आहे. “बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. नालायकपणा किती आहे. आधी फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ बाहेरुन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला. असं टुणटुण करुन” असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -